शहापूर शहरातील चौकांच्या नामफलकांची दुरावस्था

नूतनीकरणासाठी नगराध्यक्षांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष

शहापूर (शामकांत पतंगराव) : शहापूर तालुक्याच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे अशा थोर समाजरत्नांच्या स्मरणार्थ शहरातील विविध चौकांत नामफलक लावण्यात आले आहेत.त्यांची दुरावस्था झाली असून त्या फलकांचे नूतनीकरण व्हावे यासाठी शहापूरनगरपंचायतच्या नगराध्यक्षा रजनी शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.
शहापूरचे गंगारोड परीसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक,शहापूर तालुक्याच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे असे माजी आमदार पा शि देशमुख चौक, विठ्ठल दादा खाडे चौक, स्वातंत्र्यसैनिक माने चौक,स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ पीतळे मार्ग अशा महान समाजरत्ननांच्या स्मरणार्थ शहरातील विविध चौकांत नामफलक लावण्यात आले आहेत.त्यात भगवा चौकचा ही समावेश आहे.
या सर्व नामफलकांची दुरावस्था झाली असून ते सुस्थितीत नसल्याने आज(दि.२२) शहापूरच्या नगराध्यक्षा रजनी संतोष शिंदे यांनी पाहणी करून या सर्व नामफलकांचे नुतनीकरण व्हावे व तालुक्यातील जनतेला आदरणीय असलेल्या या सर्व व्यक्तिमत्वांच्या कार्याचा आदर व्हावा यासाठी मुख्याधिकारी वैभव गारवे यांना पत्र देऊन लक्ष वेधले आहे.

 305 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.